Tuesday, August 6, 2019

मी कोण आहे - नौकर ? - Who Am I - Employee ?






मला असे वाटते , की या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती 3 गोष्टीसाठी धडपड करतो.
1.       पैसा  -  Money
2.       वेळ – Freedom ( Time)
3.       दर्जदार जिवन – Quality Lifestyle.

  मी खाली माझ्या निरिक्षणातुन तसेच अभ्यासातुन काही प्रकारच्या लोकांचे उदाहरणे दिली आहेत.
त्यातुन समजुन घ्या आपण कोणत्या गटां मोडतो ?

आपल्याला चार प्रकारचे लोक समजात भेटतील.
यात मी सरकारी कर्मचार्याबद्द्ल उल्लेख केलेला नाही.
अ.     Employee – नोकर -  या गटांतील लोक दुसर्यांना श्रिमंत बनवण्यात धन्यता मानतात. हे पगारांवर कामे करतात.
या गटांतील लोकांवर नेहमी पैशाची चणचण भासत असते.

आ.   Self- Employee – स्वता: मालक / स्वता: नौकर : या गटांतील लोक स्वता:ला श्रिमंत बनवण्यात प्रयत्नशील असतात. या गटांतील लोक नौकर व मालाकापेक्षाही प्रत्यक्षात जास्त कामे करतात. या गटांतील लोक विवीध Services सेवामध्ये पार्टनर म्हणुनही कामे करतात.

या गटांतील लोकांकडे नेहमी वेळ नसते किंवा वेळेचा अभाव असतो.

इ.       Businessman – मालक : या गटांतील लोक स्वताला श्रिमंत बनवण्यात यशस्वी होतात. हे पगारांवर कामे करुण घेतात. बाजारात एखाद्या सेवेची व प्रोडक्टची हे लोक सेवा पुरवतात, व त्या सेवेतुन चांगले नफा मिळवतात. पण प्रत्यक्षामध्ये हे स्वता कमी काम करुन आपल्या नौकरा कडुन कामे करुन घेता व त्याना पगार पुरवतात.

या गटांतील लोकांकडे पैसा तसेच वेळ ही असतोच.


ई.       Investor : गुंतवणुकदार -  या गटांतील लोक समाजामध्ये खुप थोडे आहे. पण हे वरच्या तीन्ही गटांतील लोकानपेक्षा जास्त श्रिमंत असतात. हे लोक विवीध व्यवसायमध्ये पैसे गुंतवतात. व त्या व्यवसायामधुन होणार्या नफ्याचे वाट्यात ते सहभागी असतात.
जगातील जवळपास सर्वच श्रिमंत व्यक्ती हे गुंतवणुकदार आहे.

या गटांतील लोकांकडे पैसा तसेच वेळ ही असतोच.
पण हे लोक दर्जेदार जिवन ही जगत असतात.
हे लोक सामाजिक योगदानात अग्रेसर असतात. आणि यात ते धन्यता मानतात.

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌_______________________________________________________________
मला असे वाटते आपण स्वतासाठी , कुंटुबासाठी , समाजासाठी स्वताच्या प्रगतीकडे काळजीपुर्वक लक्ष देण गरजेचे आहे.

आपण ही योग्य त्या जाग्रुत चित्त्ताने आपला गट (वरिल मी मांडलेले) कष्टाने बदलु शकतो.
आपल्या कुंटुबाची , समाजाची , देशाची प्रगती ही आपल्या वैयक्तिक प्रगतीवर अवलंबुन असते.
म्हणुन आपण स्वताला अगोदर प्रगत करणे महत्वाचे ठरेल.



Wrote By - Mr. Pankaj Chandrabhan Tribhuvan.
Note : Images are used only for Knowledge purpose .

1 comment: