Monday, August 5, 2019

10 गोष्टी ज्या आपल्याला शाळेत शिकवल्या जात नाहीत.








      How to sell

सेल – म्हणजे केवळ विकणे नसुन स्वताला Represent करणे असा ही अर्थ आपण लावु शकतो.
आपण काही काम करत असु आपणास स्वताला Represent करावच लागत.
आपण जॉब करत असाल तर आपल्याला बॉसला सुध्दा Prove करुन दाखावे लागते.
आपण एक युवा असाल तर आपल्याला पार्टनरवर छाप सोडावीच लागते.
हे सर्व काही स्वताला Represent करणे किंवा विकणेच नव्हे काय ?

         
          How to think

विचार कसा करायचा ?
आपल्याला शाळेत,कॉलेजमध्ये Science , Math,Physics,Chemistry, Sociology, etc…
हे विषय तर खुप छान रितिने शिकवले जातात.
पण चांगला विचार कसा करायचा ?
वाईट विचारांना कसे हाताळायचे ?
याचे प्रशिक्षण मात्र दिले जात नाही.
पण मात्र नेहमी चांगला विचार करा , असा बोचरे सल्ले मात्र दिले जातात.



How to Negotiate

Negotiate – म्हणजे भाव करणे, तोलमोल करणे , वाटाघाटी करणे इतर....
दैनदिन जिवनात या कौशल्याची आपल्याला खुपच गरज लागत असते.
पण दुर्दैवाने हे कौशल्य किंवा कला आपल्याला शाळेत,कॉलेजमध्ये शिकवलीच जात नाही.
संवाद, चिकाटी अशे अनेक गुण या कौशल्यातुन अवगत होतात.
म्हणुन हि कला शाळेत,कॉलेजमध्ये शिकवले जाणे गरजेचे आहे.
     





      How to face failure


Failure – म्हणजेच अपयश होय.
अपयश ही यशाची पहीली पायरी आहे.
पण समाजामध्ये अपयशकडे बघण्याचा द्रुष्टिकोण हा खुपच वाइट आहे.
आपण बघतो की अपयशी लोकाना समाजातील काही दुष्ट लोक खुप हिनवतात, चिडवतात, कमी लेखतात.
अपयशी लोकाना समजात हिनवले जाते.
यातुन अपयशी लोक निराश होतात,त्यात ते चिंताग्रस्त होऊ शकतात,
काही अपयशी लोक यातुन मार्ग ही काढतात तर काही नैराश्याचे शिकार होतात.
यातुन खचुन गेलेले तर आपण खुप उदाहरणे बघतोच.
आपल्याला शाळेत,कॉलेजमध्ये यावर मात करण्यासाठी काही कार्यशाळा होणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना परिक्षेमध्ये, युवकांना व्यवसायामध्ये अपयश येणे ही एक सामान्य गोष्ट आहे.
यातुन काय मार्ग काढायचा ?
यातुन कसा मार्ग काढायचा ?

याचे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

      How to manage time

Time – वेळ या शब्दाचा अर्थ मला सांगण्याची काही गरज नाही.
आजच्या जगात वाढत्या मोबाईलच्या वापरामुळे विद्यार्थ्याना वेळेचे तर भानच राहत नाही.
परिणामी त्याच्या वैयक्तिक , माणसिक गोष्टींवर परीणाम दिसुन येताय.
त्याच बरोबर विद्यार्थाना व युवकाना वेळेचे नियोजण करता येत नाही.

वेळेवर काम करणे याचे फायदे मला काही सांगयची गरज नाही.
मला वाटते वेळेचे नियोजण या विषयावर आपल्याला शाळेत,कॉलेजमध्ये कार्यशाळा होणे आवश्यक आहे.

How to Invest Money

Invest - गुंतवणुक
केवळ पैसाच नव्हे तर वेळ पण योग्य त्या ठिकाणी गुंतवणुक कसा करावे हे युवकांना शिकवणे आज गरजेचे झाले आहे.
आज आपल्या शैक्षणिक पध्दतीत मध्ये शिक्षण हे केवळ नोकरी मिळण्यासाठी केले जातेय.
जो पर्यत शिक्षणांचा उदेश्य हा केवळ नोकरी मिळवण्याचा असेल तो पर्यत समाजात केवळ नोकरच तयार होतील.
आपल्या युवकांना अशा शिक्षणाची गरज आहे ज्यातुन ते व्यवसाय , गुंतवणुक अशा गोष्टिंकडे वळतील.
जेणे करुण समाजात नोकर नाही तर मालक व गुंतवणुकदार तयार होतील.
युवकांना व्यवसाय , गुंतवणुक अशा गोष्टिंचे मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.

Principle of Success

Success – यश याची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते.
उदा.
एक व्यवसायिकासाठी भरघोस नफ्फा हे त्याच्यासाठी यश असु शकते.
एक विद्यार्थासाठी परिक्षेमधील चांगले मार्क हे यश असु शकते.
एक स्पर्धा परिक्षेमध्ये भाग घेणार्या युवकासाठी त्याची निवड होणे यश असु शकते.

म्हणजेच यश हे सर्वांसाठी सारखे नसुन तो एक माणसिक अनुभव आहे असे मला वाटते.
आणि यश मिळवण्यासाठी खुप सारे तत्व आहेत


ज्यात प्रामुख्याने
1.   नियमितता
2.   आत्मविश्वास
3.   चिकाटी
4.   कधि न हार मानन्याची व्रुत्ती
5.   हारले तरीही त्यातुन धडा घेण्याची सवय
6.   चांगल्या वातावरणाचा सहवास(Environment)
7.   चांगल्या सवयी
अजुन खुप काही ...
ह्या सर्व गोष्टीचा सराव घेणे सुध्दा आवश्यक आहे.
यासाठी शाळेत,कॉलेजमध्ये कार्यशाळा मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.

How to find your Passion

Passion – आवड –
विद्यार्थी दशेत असतानाच विद्यार्थाना आपली आवड माहीती करुन देणे किती मोलाचे असेल हे मला विशेष करुन सांगायचे.
विद्यार्था शाळेतुन महाविद्यालयात प्रवेश घेताना केवळ आपली आवड माहीती नसल्यामुळे चुकिच्या शाखेत प्रवेश घेतात.

त्यात काहींना आपल्या जिवनाचा उद्देश ( Goal ) माहीतीच नसतो.
केवळ माझा मित्र व मैत्रिण science ला अ‍ॅडमिशन घेतोय म्ह्णुन मी हि घेतोय अशे हि महाभाग असतात.
यात काही दोश पालकांचा ही असतो, काही पालक विद्यार्थाचा विचार न करता , त्याच्या आवडी निवडीचा विचार न करता , विद्यार्थाचे त्याच्या मनाप्रमाणे अ‍ॅडमिशन करुन देतात.
परिणामी विद्यार्थाची गुणवत्ता खालावते.
यासाठी शाळेत,कॉलेजमध्ये विद्यार्थाचे तसेच पालकांची कार्यशाळा व मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.
जेणे करुण विद्यार्थी आपल्या आवडी प्रमाणे शिक्षण घेऊ शकतील.


How to handle money

Money – पैसा
पैसा या शब्दाला आपली एक वेगळीच व्याख्या आहे.
जगातील ९९% पैसा हा केवळ 1 % लोकाकडे आहे. आणि तेच लोक जगावर नियंत्रण करतात.
आपण सकाळी उठल्यापासुन (कोणत्या कंपनीचे Toothpaste वापरले पाहिजे) तर झोपे पर्यत (कोणते मच्छर कॉइल वापरली पाहिजे ) हे सर्व हे श्रिमंत लोक ठरवतात.
असे म्हणतात ना की पैसा सर्व काही नसतो पण पैशाच्या वाचुन ही खुप कामे अडतात.
उदा.
आपण किती चांगले बोलणारे व्यक्ती असा कोणाला पैशाची गरज भासली तर तुमचे बोलणे काही कामाचे नसते.
तुम्ही कीती चांगले व्यक्ती असले , पण तुमच्या मुलांना मोठ्या शाळेमध्ये अ‍ॅडमिशन करावयचे असेल तर तुमचा चांगुलपणा काही कामाचा नसतो.
अशे खुप कामे आहे जे केवळ पैशामुळेच अडते.

मला वाटते , आज प्रत्येक शाळेत,कॉलेजमध्ये पैशाबाबत व्यवहारिक ज्ञान देणे आवस्यक आहे.
पैसा कसा कमवायचा ? ( Active Money / Passive Money)
कीती कमवायचा ? ( Turnover / Monthly Payments)
कधी कमवायचा ? ( For students First Learning then Earning)
कोणासाठी कमवायचा ? (For help to needy , For Quality lifestyle etc…)

वरिल सर्व गोष्टीवर शाळेत,कॉलेजमध्ये विद्यार्थाचे तसेच पालकांची कार्यशाळा व मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.

How to start a Business


Business – व्यवसाय
जो पर्यत शिक्षणांचा उदेश्य हा केवळ नोकरी मिळवण्याचा असेल तो पर्यत समाजात केवळ नोकरच तयार होतील.
मला असे वाटते ,नौकरी करुन आपण एक कुंटुबाचे पोषण तर करु शकु पण जर पुढच्या पिढ्या घडवायच्या असेल तर व्यवसायाशिवाय पर्यायच नाही.
शाळेत,कॉलेजमध्ये विद्यार्थाचे तसेच पालकांची कार्यशाळा व मार्गदर्शन होणे आवश्यक आहे,तसेच सरकारी योजनाचाही आढावा देत, विद्यार्थाना तसेच युवकाना व्यवसयासाठी प्रोत्साहन देणे आवस्यक आहे.



Wrote By - Pankaj Tribhuvan


Note : All images used only for knowledge purpose.

3 comments:

  1. Above all things are in syllabi, but teacher lacking in knowledge. Government has to focus on "Teacher Education".
    Example Personality Development so called (व्यक्तिमत्व विकास) is already there in our curriculum

    ReplyDelete